पुणे : दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी डिजिटल टास्क फॉर्स आणि ग्लोबल साइबर क्राइम हेल्पलाइन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सायबर क्राईम हेल्पलाइन अवार्ड २०१९’ चे आयोजन करण्यात आले आहे.
या अवार्डचे हे चौथे वर्ष आहे, दि.१४ डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता पुणे येथील पंडित जवाहरलाल नेहरू सभागृह, घोले रोड, शिवाजीनगर पुणे येथे या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थापक अध्यक्ष रोहन न्यायाधीश यांनी दिली.
या पुरस्कार सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस उपमहानिरीक्षक राजेंद्र डहाळे, अतिरिक्त पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, माजी सहायक पोलिस आयुक्त भानूप्रताप बर्गे, वकील नंदू फडके, वकील शिशिर हिरे, माजी उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, कुलसचिव शिवाजी विद्यपीठ कोल्हापूर डॉ. विलास नांदवडेकर, ट्रिनिटी महाविद्यालयाचे डॉ. निलेश उके, सुमित ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रभाकर साळुंके उपस्थित असणार आहेत.
सायबर गुन्हेगारीच्या माध्यमातून सातत्याने महिलांवर अत्याचाराच्या घटनेट वाढ होत आहे. त्यामध्ये सायबर स्टोकिंग, सोशल मीडियाच्या माध्यमातून ब्लॅकमेल करणे, बदनामी करणे, आर्थिक फसवणूक आदी घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. अश्या घटनांना आवर घालणे गरजेचे आहे.
यासंदर्भात सायबर व त्याबाबतच्या कायद्याची माहीत असणे गरजेचे आहे तसेच त्यांच्यामध्ये सायबर जनजागृती होणे आवश्यक आहे. यासाठी ‘ग्लोबल सायबर क्राईम हेल्पलाइन अवार्ड’च्या माध्यमातून त्या त्या क्षेत्रातील तज्ञ मान्यवरांचे मार्गदर्शन आणि या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात येत असल्याचे रोहन न्यायाधीश यांनी सांगितले.