पुणे, २४ मार्च २०२३: आयटी सेवा फर्म एक्सेंचरने गुरुवारी सांगितलं की ते आपल्या कर्मचार्यांपैकी सुमारे २.५% किंवा १९,००० कर्मचार्यांना काढून टाकेल. ही मॅक्रो इकॉनॉमिक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर नोकऱ्या कपातीची घोषणा करणारी नवीन मोठी टेक कंपनी बनलीय. कंपनीने वार्षिक महसूल आणि नफ्याचा अंदाजही कमी केला. रॉयटर्सच्या अहवालानुसार, अर्ध्याहून अधिक टाळेबंदीचा त्याच्या नॉन-बिल करण्यायोग्य कॉर्पोरेट फंक्शन्समधील कर्मचाऱ्यांवर परिणाम होईल.
एक्सेंचरने त्यांचा खर्च वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याची घोषणा केलीय. २०२३ च्या उत्तरार्धात आणखी लोकांना कामावर घेणं सुरू ठेवणार असल्याची पुष्टी कंपनीने केलीय.
हजारो कर्मचार्यांना काढून टाकण्याची घोषणा करणारी एक्सेंचर ही नवीन टेक कंपनी आहे. या आयटी फर्मने पुष्टी केलीय की, जागतिक अर्थव्यवस्था बिघडण्याच्या भीतीने ते तब्बल १९,००० कामगारांना कामावरून काढून टाकत आहेत. हे त्यांच्या एकूण कर्मचार्यांच्या सुमारे २.५ टक्के आहे. परंतु, चांगली गोष्ट अशी आहे की एक्सेंचर कर्मचार्यांना ताबडतोब काढून न टाकता ही प्रक्रिया पुढील १८ महिने सुरू राहील असं ठामपणे सांगते.
न्यूज अनकट प्रतीनिधी: केतकी कालेकर