ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसलेंना कोरोनाची बाधा, यंत्रणा हादरली

माढा, ९ डिसेंबर २०२०: युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं प्रदान करण्यात येणारा “ग्लोबल टीचर अवॉर्ड” या पुरस्काराचे यंदाचे मानकरी सोलापूर जिल्हा परिषदेच्या परितेवाडी प्राथमिक शिक्षक रणजितसिंह डिसले यांना कोरोना बाधा झाली आहे. मुंबईत राज्यपाल व अन्य मान्यवरांना भेटून बार्शीत येताच त्यांना ताप आला रँपिड तपासणीत रिपोर्ट पाँझिटीव्ह आला आहे. त्यामुळं यंत्रणा हादरली आहे.

डिसले गुरुजींच्या सोबत त्यांचे कुटुंबीय होते. पत्नीचा रिपोर्ट पाँझिटीव्ह आहे, अन्य कुटुंबिय रँपिड टेस्ट मध्ये निगेटिव्ह आहेत.

विशेष म्हणजे मागील काही दिवसापूर्वी रणजितसिंह डिसले हे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, राज्यपाल भगतसिंग कोशारी, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, सोलापूर जिल्ह्याचे पालक मंत्री दत्तात्रय भरणे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, अनिल परब पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे या सर्वांशी भेटले व संपर्कात आलेले आहेत.

याशिवाय एका खासगी वृत्तवाहिनीवर मुलाखतीच्या निमित्तानं संपर्कात आले आहेत. हजारो लोक शुभेच्छा देण्यासाठी संपर्कात आल्यानं डिसले गुरुजींनी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोणा चाचणी करून घेण्याचं सांगितलं आहे. मंगळवारी त्यांना त्रास होऊ लागल्यानं बुधवारी टेस्ट केली असता ते पॉझिटिव आल्याचं समोर आलं आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा