“आपल्या देशात परत जा आणि सामुहिक बलात्कार करून घे”,या अभिनेत्रीच्या पुस्तकात धक्कादायक खुलासा….

5

मुंबई, २४ फेब्रुवरी २०२१: बाॅलिवूड मधील अभिनेत्री प्रियंका चोप्रा  हि ने आज सातासमुद्रापार आपल्या आभिनयाची छाप सोडली आहे. तर त्यामुळे देशाचं नाव देखील या अभिनेत्री ने तिकडे पोहोचवलं. आज आभिनयाच्या जोरावर आणि आपल्या आतील कलागुणांनमुळे तिने हाॅलिवूड चित्रपट सृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

हाॅलिवूड चित्रपट सृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी प्रियंकाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागले.आणि ये असंख्य अडचणीनंवर मात करत प्रियंकाने करून दाखवलं.नुकतेच तिचं “अनफिनिश्ड” हे पुस्तक प्रकाशित झालं ज्यामधे एक धक्कादायक खुलासा प्रियंकाने केला आहे.

अमेरिकी मालिकेत काम करण्यापूर्वी प्रियंकाचं ‘इन माय सिटी’ हे गाणं प्रदर्शित झालं होतं.या गाण्यामुळे प्रियंका खुप आनंदी होती.परंतू या गाण्यानंतर तिच्यावर वर्णभेदी टीका करण्यात आली.तसेच काहीजणांनी आपल्या देशात परत जा आणि सामुहिक बलात्कार करून घे,अश्या शब्दात टीका केली.असं तिने लिहलं आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा