Go First Flightचे कोईम्बतूरमध्ये आपत्कालीन लँडिंग, विमानात होते ९२ प्रवासी, इंजिनमध्ये बिघाड

Flight Emergency Landing, १३ ऑगस्ट २०२२: शुक्रवारी बेंगळुरूहून मालदीव, माले येथे जाणाऱ्या गो फर्स्ट विमानाच्या इंजिनमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाला. इंजिन जास्त तापल्याने अलार्म वाजण्यास सुरुवात झाली, त्यामुळं विमानाला घाईघाईत कोईम्बतूर विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावं लागलं.

मिळालेल्या माहितीनुसार, विमानात ९२ प्रवासी होते. तामिळनाडू शहरावर उड्डाण करत असताना पायलटला धुराचा इशारा मिळाला. पीटीआयच्या म्हणण्यानुसार, दोन इंजिन जास्त गरम झाल्यानंतर अलार्म वाजला. त्यात म्हटलंय की अभियंत्यांनी इंजिन तपासलं, अलार्ममध्ये काही बिघाड असल्याचं घोषित केलं आणि विमान उड्डाणासाठी योग्य असल्याचं सांगितलं.

GoFirst च्या प्रवक्त्याने सांगितले की, एअरबस ३२० या विमानाने आज दुपारी १२ वाजता उड्डाण केलं. एक तासानंतर, इंजिन जास्त गरम झाल्याबद्दल चेतावणी बेल वाजू लागली. पायलटने तात्काळ एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क साधून जवळच्या कोईम्बतूर विमानतळावर उतरण्याची परवानगी मागितली. यानंतर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. विमान उतरण्यापूर्वी अग्निशमन दल आणि बचाव कर्मचारी धावपट्टीजवळ तैनात होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा