गोल पोस्ट राष्ट्रीय गोव्याचे मुख्यमंत्री वाराणसीत, श्रावणी सोमवारनिमित्त काशी विश्वनाथच्या पिंडीवर अभिषेक

गोव्याचे मुख्यमंत्री वाराणसीत, श्रावणी सोमवारनिमित्त काशी विश्वनाथच्या पिंडीवर अभिषेक

पणजी, ४ सप्टेंबर २०२३ : गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत, भाजपचे नेते प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आज श्रावणी सोमवारनिमित्त वाराणसी येथे दाखल झाले. त्यांनी काशी विश्वनाथ मंदिरामध्ये जाऊन शिवपिंडीवर अभिषेक केला आहे.

मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत व तानावडे यांच्यासोबत माजी खासदार व प्रदेश भाजपचे सरचिटणीस अँड नरेंद्र सावईकर, माजी राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, माजी आमदार व भाजपचे प्रदेश सरचिटणीस दामोदर नाईक, भाजपचे प्रदेश खजिनदार संजीव देसाई व उपाध्यक्ष दत्ता खोलकर यांनी काशी विश्वेश्वराचे दर्शन घेतले आहे.

आम्ही सर्वांनी काशी विश्वेश्वराचे दर्शन घेतले. श्रावणी सोमवार या पवित्र दिवशी शिवपिंडीवर विधिवत अभिषेक केला. आणि गोवेकरांसाठी चांगले आरोग्य, संपन्नता व गोव्याच्या विकासासाठी प्रार्थना केली, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी यावेळी दिली.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version