न्यूयॉर्क ४ जुन २०२३ : हॉलिवूड मधील महान अभिनेते, ‘गॉडफादर’ फेम अल पचिनो वयाच्या ८३ व्या वर्षी बाप होणार आहेत. त्यांची २९ वर्षीय गर्लफ्रेंड आठ महिन्यांची गरोदर आहे. त्यांची गर्लफ्रेंड नूर अलफल्लाह हिला दोन महिन्यांपूर्वी ती गरोदर असल्याची माहिती मिळाली. विशेष म्हणजे, अल पचिनो यांना ही बातमी समजल्यावर सुरुवातीला बाळ आपलेच आहे यावर विश्वास बसला नाही. वयाची ऐंशी वर्षे ओलांडल्यावर आपण वडील होऊ शकतो का? असा प्रश्न त्यांना पडला. म्हणून त्यांनी डीएनए चाचणी करुन घेतली. नंतर चाचणीत हे मूल अल पचिनो यांचेच असल्याची खात्री झाली.
अल पचिनो यांची २९ वर्षीय मैत्रीण नूर अलफल्लाह ८ महिन्यांची गर्भवती आहे. नूर आणि अल पचिनो यांची भेट कोरोना काळात झाली होती. यावेळी दोघेही एकमेकांच्या जवळ आले. नूरला अल पचिनो यांच्या वयाची कोणतीही अडचण नाही, अल पचिनो तिच्या वडिलांपेक्षा वयाने मोठे आहेत. नूरचे अफेअर साठ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पुरुषांसोबत होते. अल पचिनो यांच्या आधी, प्रसिद्ध गायक माईक जॅगर ७४ वर्षे आणि उद्योगपती निकोलस बर्ग्रेन ६१ वर्षे यांच्यासोबत ती रिलेशनशिपमध्ये होती. याशिवाय काही काळापूर्वी ती ९१ वर्षीय फिल्ममेकर क्लिंट ईस्टवुडसोबतही दिसली होती. मात्र, क्लिंट ईस्टवूड हे तिचे केवळ फॅमिली फ्रेंड असल्याचे नूरने स्पष्ट केले होते. नूर एका श्रीमंत कुवैती कुटुंबातील आहे. ती कुवैती-अमेरिकन वंशाची आहे. तीची आई कुवेतची आहे, तर वडील अमेरिकेचे आहेत.
अल पचिनो आता चौथ्यांदा बाप होणार आहे. त्यांनीही आपल्या आयुष्यात अनेक महिलांना डेट केले आहे. त्यांनी ४० वर्षीय इस्रायली अभिनेत्री मीतल दोहानला डेट केले. याशिवाय त्यांचे जॉन टेरंट नावाच्या महिलेशीही संबंध होते. याशिवाय जिल क्लेबर्ग, डियान कीटन, पेनेलोप एन मिलर आणि कॅथलीन क्विनलन यांच्याशीदेखील अल पचिनो रिलेशनशिपमध्ये होते. अल पचिनो यांच्या मोठया मुलीचे नाव ज्युली मेरी असून ती ३३ वर्षांची आहे. ९० च्या दशकात शेवटी शेवटी अल पचिनो यांनी बेव्हरली डी’एंजेलोला डेट केले. बेव्हरली डी’एंजेलो आणि अल पचिनो यांना अँटोन आणि ऑलिव्हिया ही जुळी मुले आहेत. या मुलांचे वय २२ वर्षे आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.













































