सोन्या-चांदीच्या वायदा किमती घसरल्या

नवी दिल्ली, १७ सप्टेंबर २०२०: गुरुवारी सोन्या-चांदीच्या वायद्याच्या किंमती मोठ्या प्रमाणात घसरल्या. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स) वर ऑक्टोबर २०२० मध्ये सकाळी ११.१० वाजता देण्यात आलेल्या सोन्याचा भाव ३६३ रुपये म्हणजेच ०.७० टक्क्यांनी घसरून ५१,४६१ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. मागील सत्रात सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ५१,८२४ रुपये होता. त्याचबरोबर डिसेंबर कॉन्ट्रॅक्ट सोन्याचे भाव ३६३ रुपयांनी म्हणजेच ०.७० टक्क्यांनी घसरून५१,६२५ प्रती १० ग्रॅम झाली. बुधवारी फ्युचर्स मार्केटच्या डिसेंबर २०२० च्या सोन्याचे भाव प्रती १० ग्रॅम ५१,९८८ रुपये होते.

फ्युचर्स मार्केटमध्ये चांदीची किंमत

मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये चांदीची किंमत डिसेंबर २०२० च्या कॉन्ट्रॅक्ट साठी सकाळी ११.२४ वाजता ८६९ म्हणजेच १.२६ टक्क्यांनी घसरून प्रति किलो चांदीची किंमत ६७,९१२ रुपये होती. मागील सत्रात चांदीची किंमत डिसेंबर डिलिव्हरी साठी ६८,७८१ रुपये प्रतिकिलो होती. त्याचबरोबर मार्च २०२१ कॉन्ट्रॅक्ट साठी चांदीचा भाव ८३८ म्हणजेच १.१८ टक्क्यांनी घटून ७०,२२९ रुपये प्रति किलो झाला. बुधवारी, मार्च २०२१ रोजी चांदी कॉन्ट्रॅक्टची किंमत ७१,०६८ रुपये प्रतिकिलो होती.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत

ब्लूमबर्गच्या मते, जागतिक बाजारपेठेतील सोन्याच्या किमतींबद्दल जर आपण चर्चा केली तर डिसेंबर २०२० डिलिव्हरी सोन्याचा भाव १९.७० म्हणजेच १ टक्के घसरून १९५०.८० डॉलर होती. स्पॉट मार्केटमध्ये (प्रत्यक्ष) सोन्याचा भाव १६ डॉलर म्हणजेच ०.८२ टक्क्यांनी घसरून १९४३.२६ डॉलर प्रति औंस झाला.

आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीची किंमत

सोन्याप्रमाणे चांदीच्या किंमतीही आंतरराष्ट्रीय बाजारात घसरत आहेत. कॉमॅक्सच्या डिसेंबर २०२० डिलिव्हरी मधील चांदीची किंमत ०.५१ डॉलर म्हणजेच १.८६ टक्क्यांनी कमी होऊन २६.८७ डॉलर प्रति औंस झाली. त्याचबरोबर स्पॉट मार्केट(प्रत्यक्ष) मध्ये चांदीची किंमत ०.३८ डॉलर म्हणजेच १.४१ टक्क्यांच्या घसरणीसह २६.६८ डॉलर प्रति औंसच्या पातळीवर होती.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा