सोन्याने 52 हजारांचा आकडा केला पार, चांदीच्या दरातही वाढ, जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

मुंबई, 5 जुलै 2022: भारतीय सराफा बाजारात सोने-चांदीच्या किमतीत वाढ झाली आहे. या आठवड्याच्या दुसऱ्या व्यवहाराच्या दिवशी (मंगळवार) 5 जुलैच्या सकाळी सोन्याच्या दरात किंचित वाढ झाली आहे, तर चांदीच्या दरातही किंचित वाढ झालीय. शुद्ध सोनं 52 हजारांच्या पुढं आहे, तर शुद्ध चांदीचा भाव 58 हजार रुपये प्रति किलोच्या वर आहे.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या अधिकृत वेबसाइटनुसार, ibjarates.com, 5 जुलै रोजी सकाळी सराफा बाजारात 999 शुद्ध 24 कॅरेट सोन्याने 52 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमचा टप्पा ओलांडला आहे. अनेक दिवसांपासून सोने 50 हजारांच्या पुढे तर चांदी 60 हजार रुपयांच्या खाली विकली जात आहे.

ibjarates.com नुसार, 999 शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याचा दर किरकोळ वाढून 51467 रुपये प्रति 10 ग्रॅम झालाय, तर 999 शुद्धतेच्या चांदीचा दर आता 65825 रुपये प्रति किलोवर पोहोचलाय, जो आदल्या दिवशी म्हणजे मंगळवारी किलोग्रॅम रु. 66468 होता.

इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनने जाहीर केलेल्या किमती वेगवेगळ्या शुद्धतेच्या सोन्याच्या मानक किमतीची माहिती देतात. या सर्व किमती कर आणि मेकिंग चार्जेसच्या आधीच्या आहेत. IBJA ने जारी केलेले दर देशभरात सार्वत्रिक आहेत परंतु GST त्याच्या किमतींमध्ये समाविष्ट केलेलं नाही. दागिने खरेदी करताना, कर समाविष्ट केल्यामुळं सोने किंवा चांदीचे दर जास्त आहेत.

याप्रमाणे सोने-चांदीचे नवीनतम दर तपासा

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्ट्या वगळता, शनिवार आणि रविवारी इब्जा द्वारे दर जारी केले जात नाहीत. 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. थोड्याच वेळात एसएमएसद्वारे दर प्राप्त होतील. याशिवाय, तुम्ही वारंवार होणाऱ्या अपडेट्सच्या माहितीसाठी www.ibja.co किंवा ibjarates.com ला भेट देऊ शकता.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा