मुंबई : सोन्याच्या खरेदीदरम्यान होणाऱ्या ग्राहकांच्या फसवणुकीला चाप लावण्यासाठी केंद्र सरकारने नवा नियम जारी केला आहे. या नियमाची अंमलबजावणी मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर होणार आहे.
सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग सक्तीचे केले जाणार आहे. यासाठी सराफांना लायसन्स दिले जाणार आहे. हे लायसन्स सराफाकडे असणे आवश्यक आहे. होलमार्क दागिन्यांबाबत होणारी फसवणूक टाळण्यासाठी या नियमाची अंमलबजावणी केली जात आहे.
देशात सोन्याच्या दागिन्यांचे हॉलमार्किंग करणे याआधी ऐच्छिक होते. या नियमामुळे सगळ्या सराफांना दागिन्यांची विक्री करण्यासाठी हॉलमार्किंग करणे सक्तीचे आहे. याआधी सोन्याची गुणवत्ता तपासण्यासाठी कोणतीही यंत्रणा नव्हती. त्यामुळे ग्राहकांना कमी गुणवत्तेचे सोनेही विकले जायचे आणि पैसे मात्र शुद्ध सोन्याचे घेतले जायचे.
नियम पाळला नाही तर शिक्षा
देशभरात २३४ जिल्ह्यांमध्ये ८९२ हॉलमार्किंग केंद्रं सुरू करण्यात आली आहेत. हॉलमार्किंगचा नियम पाळला नाही तर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. याप्रकरणी दंडात्मक कारवाई किंवा तुरुंगवासही होऊ शकतो. ग्रामीण भागातल्या सराफांना मात्र यातून सूट देण्यात आली आहे. तिथे अजून हॉलमार्किंगची केंद्र व्हायची आहेत. त्यासाठी अजून १ वर्ष लागेल.