कालच्या सत्रात सोने-चांदीच्या किमतीत मोठी घसरण

नवी दिल्ली, ३ मार्च २०२१: मंगळवारी सोन्या-चांदीच्या दरांमध्ये मोठ्या प्रमाणात घट दिसून आली. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोने-चांदीच्या दरांमध्ये झालेली घसरण भारतीय बाजारांमध्ये देखील दिसून आली. याचे दुसरे कारण असेही आहे की डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाला होता. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते राष्ट्रीय राजधानीत सोन्याच्या किंमतीत प्रति १० ग्रॅम ६७९ रुपयांची घसरण नोंदली गेली. यामुळे दिल्लीत सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४४,७६० रुपये झाली होती.

यासह चांदीच्या दरांमध्ये देखील घसरण दिसून आली. दिल्लीत दरात किलोमागे १,८४७ रुपयांची घसरण नोंदली गेली. अशा प्रकारे दिल्लीत चांदीचा दर प्रतिकिलो ६७,०७३ रुपयांवर आला. मागील सत्रात चांदीची किंमत प्रति किलो ६८,९२० रुपये होती. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याची किंमत प्रति औंस १,७१९ डॉलरवर घसरली होती. त्याचप्रमाणे चांदीचा भाव औंस २६.०८ डॉलरवर होता.

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल म्हणाले की, “जागतिक स्तरावर सोन्याच्या किमतीत घसरण आणि रुपया मजबूत होत असल्यामुळे दिल्लीतील २४ कॅरेट सोन्याची किमतीत प्रति १० ग्रॅम ६७९ रुपयांची घसरण नोंदली गेली. तपन पटेल म्हणाले की, डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाला.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा