RRR चित्रपटाला गोल्डन ग्लोबचे नामांकन!

मुंबई, १३ डिसेंबर २०२२ :केवळ भारतातच नव्हे तर जगभरात धुमाकूळ घातलेल्या एसएस राजामौली यांच्या RRR चित्रपटाच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला आहे. RRR चित्रपटाचे मानाच्या गोल्डन ग्लोब (Golden Globes2023 Nomination ) पुरस्कारासाठी नामांकन झाले आहे. बेस्ट फॉरेन फिल्म आणि ‘नाचो नाचो..’ या गाण्याची बेस्ट ओरिजनल साँग या दोन प्रकारात RRR चित्रपटाला नामांकन झाले आहे. हे नामांकन नॉन इंग्लिश चित्रपटाच्या प्रकारात झाले असून RRR या चित्रपटासोबत इतर चार चित्रपट या पुरस्काराच्या शर्यतीत आहेत.

जगभरातल्या चित्रपटसृष्ठीमध्ये ग्लोल्डन ग्लोब पुरस्कार प्रतिष्ठेचा मानला जातो. ऑस्करनंतर ग्लोल्डन ग्लोब पुरस्काराचे महत्त्व आहे. त्यामुळे आरआरआर या चित्रपटाचे या पुरस्कारासाठी नामांकन झाल्याने राजामौलींवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. या चित्रपटात ज्युनिअर एनटीआर आणि रामचरण हे मुख्य भूमिकेत असून बॉलीवूड स्टार अजय देवगण, आलिया भट्ट यांच्याही भूमिका आहेत.

  • जानेवारीमध्ये होणार सोहळा

१० जानेवारी रोजी लॉस एंजेलिस येथे ‘गोल्डन ग्लोब पुरस्कार’ सोहळा होणार आहे. RRR व्यतिरिक्त ऑल क्वाएट ऑन द वेस्टर्न फ्रंट (जर्मनी), क्लोज (बेल्जियम), डिसीजन टू लीव्ह (दक्षिण कोरिया) आणि अर्जेंटिना १९८५ यांना इंग्रजी नसलेल्या भाषा श्रेणीमध्ये नामांकन मिळाले आहे. प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन कॉमेडियन जॅरॉड कार्माइकल करणार आहेत.

दरम्यान यंदाच्या ऑस्कर सोहळ्यात आरआरआरच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याचा अंदाज चाहत्यांना आहे. सोशल मीडियावरही हा विषय ट्रेंडिंग होताना दिसतो आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा