महाराष्ट्रातील तरुण बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी १०,००० रिक्तपदे भरणार

मुंबई, ९ जुलै २०२० : कोरोनाच्या जागतिक महामारीत राज्यात बेरोजगारीचा प्रश्न अनेक तरुणांना भेडसावत आसताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र पोलिस भरती प्रक्रियेच्या प्रस्ताव लवकरच राज्य मंत्रीमंडळासमोर मांडण्याचे निर्देश दिले आहेत.ज्यामुळे होतकरु आणि मेहनती तरुणांच्या या प्रयत्नांना काही अंशत: का होईना पण यश मिळेल.

महाराष्ट्रात पोलिस विभागातील हजारो पदांवर भरती होईल. मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, कायदा व सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी आणि पोलिस दलातील कामाचा ताण कमी करण्यासाठी १० हजार कॉन्स्टेबलची भरती केली जाईल.याशिवाय नागपूरमधील कटोलाटुक्क येथेही राज्य राखीव पोलिस दलाच्या महिला बटालियनची स्थापन केली जाईल.एका अधिकृत निवेदनानुसार, पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, ज्यात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि वरिष्ठ अधिकारी यांचा समावेश होता.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपले मत नमूद करत “हे पाऊल शहरी व ग्रामीण भागातील तरुणांना पोलिस दलात सेवा देण्याची संधी मिळवून देण्यास मदत करेल. वर्षभरात भरती प्रक्रिया पूर्ण होईल असे निर्देश अधिका-यांना दिले असून अधिकाऱ्यांना राज्य मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव ठेवण्यास सांगितले आहे.”

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा