ईपीएफओ कडून कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर

नवी दिल्ली, १४ डिसेंबर २०२०: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) डिसेंबर २०१९-२० आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत जवळपास ६ कोटी सभासद कर्मचार्‍यांच्या भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) मध्ये ८.५ टक्के व्याज जमा करेल. ईपीएफओच्या या निर्णयानं देशभरातील कर्मचार्‍यांसाठी ही एक अतिशय आनंददायक बातमी आहे.

सप्टेंबरच्या सुरूवातीस कामगारमंत्री संतोष गंगवार यांच्या अध्यक्षतेखाली ईपीएफओ’नं दोन हप्त्यांमध्ये हे व्याज देण्याचा निर्णय घेतला. यानुसार पहिल्या हप्त्यात ८.१५ टक्के आणि दुसर्‍या हप्त्यात ०.३५ टक्के व्याज द्यावं लागंल.

पीटीआय’नं सूत्रांच्या हवाल्यानं असं सांगितलं आहे की, कामगार मंत्रालयानं वित्त मंत्रालयाला या महिन्याच्या सुरूवातीस २०१९-२० च्या ईपीएफ’वर ८.५ टक्के (एकावेळी पूर्ण व्याज) व्याज दर देण्याचा प्रस्ताव पाठविला आहे. अर्थ मंत्रालय काही दिवसांत हा प्रस्ताव मंजूर करू शकेल.

या प्रकरणात, या महिन्यात संपूर्ण व्याज दिलं जाऊ शकतं. गेल्या वर्षीच्या व्याज दरावर अर्थ मंत्रालयानं काही स्पष्टीकरण मागितलं होतं. ज्यामध्ये सर्व उत्तरं दिली गेली आहेत. सप्टेंबरमध्ये सीबीटीच्या आभासी बैठकीत ईपीएफओ’नं गेल्या आर्थिक वर्षात ८.५ टक्के व्याज देण्याच्या आश्वासनाची पुष्टी केली.

बातमीनुसार कामगार मंत्रालयानं अर्थमंत्रालयाला २०१९-२० साठी एकावेळी ईपीएफमध्ये ८.५ टक्के व्याज लावण्याचा प्रस्ताव पाठविला आहे. हा प्रस्ताव या महिन्यात पाठविला गेला आहे. या प्रस्तावावर अर्थ मंत्रालयाची मान्यता काही दिवसांत अपेक्षित आहे. या प्रकरणात, या महिन्यात सभासदांच्या खात्यात व्याज जोडलं जाईल.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा