बळीराजासाठी आनंदाची बातमी, उजनी धरणामधून १५०० क्युसेकने पाणी सोडणार

सोलापूर २१ जून २०२३: राज्यात एकीकडे उष्णतेचा कहर वाढला आहे, तर दुसरीकडे शेतीला पाणी मिळत नसल्याने व पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत आहे. त्यातच आता आषाढी वारी सुरू झालीय, ती याच महिन्यात पंढपुरात दाखल होईल. वारकऱ्यांच्या स्नानासाठीही नदीला पाणी नाही, त्यामुळे चंद्रभागेत वारकऱ्यांची गैरसोय होणार आहे.

पंढरपुरच्या आषाढी वारीच्या सोहळ्यासाठी, माढा तालुक्यातील उजनी धरणातून चंद्रभागा नदीत बुधवारी सकाळी ९ वाजता १५०० क्युसेक्स विसर्गाने पाणी सोडले जाणार आहे. यामुळे वारकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालय. आज दिवसभरात एकूण ४५०० क्युसेक्स ४ मोरीतुन पाणी सोडले जाणार आहे. त्यामुळे चंद्रभागेच्या काठावरील शेतकऱ्यासह जवळील भागातील शेतकरीही पाणी मिळणार म्हणून आनंदात आहेत.

मागील काही दिवसापूर्वी कर्नाटकच्या उत्तर भागांमध्ये दुष्काळ जन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कोयने सह उजनी धरणातून कर्नाटकला पाणी सोडण्याची विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे केली होती. परंतु सध्या महाराष्ट्रासह देशभरातील वारीमध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी, शासनाने घेतलेल्या उजनीतून पाणी सोडण्याच्या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी- अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा