सरकारसाठी दिलासादायक बातमी, किरकोळ महागाईत मोठी घसरण

6

नवी दिल्ली, १३ ऑगस्ट २०२२: किरकोळ महागाई दराच्या आघाडीवर सरकारला दिलासा मिळालाय. जुलै महिन्यात महागाई ७ टक्क्यांच्या खाली गेली. सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, जुलैमध्ये किरकोळ महागाईचा दर ६.७१ टक्के होता. जूनमध्ये तो ७.१ होता.

मात्र, आताही तो रिझर्व्ह बँकेच्या निश्चित आकड्यापेक्षा जास्त आहे. जुलै हा सलग सातवा महिना आहे जेव्हा किरकोळ चलनवाढीचा दर रिझर्व्ह बँकेच्या निश्चित आकड्यापेक्षा जास्त राहिला आहे. मे आणि जूननंतर, ऑगस्टच्या बैठकीतही, रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीने (RBI MPC August 2022 Meet) पॉलिसी रेपो दरात वाढ केली. अशा प्रकारे, गेल्या ४ महिन्यांत रेपो दर १.४० टक्क्यांनी वाढून ५.४० टक्के झाला आहे.

अन्नधान्य महागाईत घसरण

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (NSO) च्या आकडेवारीनुसार, अन्नधान्य चलनवाढीचा दर जुलै २०२२ मध्ये ६.७५ टक्‍क्‍यांवर घसरला आहे, जो मागील महिन्यात ७.७५ टक्‍क्‍यांवर होता. अन्नधान्याच्या चलनवाढीचा वाटा CPI बास्केटच्या जवळपास निम्मा आहे.

शहरी भागातील अन्नधान्य महागाई जूनमध्ये ८.०४ टक्क्यांच्या तुलनेत जुलैमध्ये ६.६९ टक्के होती. त्याच वेळी, ग्रामीण भागात अन्नधान्य महागाई दर ६.८० टक्के आहे, जो जूनमध्ये ७.६१ टक्के होता. कच्च्या तेलासह इतर अनेक वस्तूंच्या किमती कमी झाल्यामुळे जुलै महिन्यात महागाई दरात घट नोंदवण्यात आली आहे. कोरोना महामारीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती बिकट झाली होती. मात्र, आता त्यात हळूहळू सुधारणा होत आहे.

महागाई दर लक्ष्य

रिझर्व्ह बँकेने २०२२-२३ साठी महागाईचा अंदाज ५.७ टक्क्यांवरून ६.७ टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. सरकारने RBI ला किरकोळ महागाई २ टक्क्यांच्या फरकाने ४ टक्क्यांवर ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आरबीआयने किरकोळ महागाई दर ६ टक्के ठेवण्याचे लक्ष्य ठेवले होते.

CPI मे महिन्यात किरकोळ चलनवाढीचा दर ७.०४ टक्के होता. एप्रिल महिन्यात किरकोळ महागाईचा दर ७.७९ टक्के नोंदवला गेला. CPI आधारित महागाई मे महिन्यात ७.०४ टक्के, एप्रिलमध्ये ७.७९ टक्के, मार्चमध्ये ६.९५ टक्के, फेब्रुवारीमध्ये ६.०७ टक्के आणि जानेवारीमध्ये ६.०१ टक्के होती.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा