विराट कोहलीला मिळाली आनंदाची बातमी

दुबई, १७ सप्टेंबर ,२०२० : आयपीएल २०२० येत्या १९ सप्टेंबर पासून सुरू होत आहे . अशातच आयपीएल सुरू होण्याआधीच आरसीबी संघाचा कर्णधार विराट कोहली याला गोड बातमी मिळाली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याची आयसीसी वनडे रँकिंग मध्ये प्रथम स्थानी निवड झाली आहे. तसेच इंग्लंड संघाचा जॉनी बेरस्टो याला नुकत्याच संपलेल्या ऑस्ट्रेलिया संघाविरुद्धच्या एकदिवसीय शृंखले नंतर त्याला टॉप १० मध्ये स्थान मिळवण्यात यश मिळाले आहे.

विराट कोहली याने आयसीसी एकदिवसीय यादीत ८७१ गुणांसह प्रथम स्थान मिळवले आहे. तसेच भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा याने ८५५ अंकांसह दुसरे स्थान मिळवले आहे.

कोव्हिड १९ मुळे गेल्या काही महिन्यांमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट वर बंदी घालण्यात आली होती. असे होऊन सुद्धा कर्णधार विराट कोहली याने आपले स्थान कायम ठेवले आहे. तसेच जॉनी बेरस्टो याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध एकूण १९६ धावा ठोकल्या. आणि अंतिम सामन्यात १२६ चेंडूंवर ११२ धावांची धमाकेदार खेळी केली. याच धावांच्या जोरावर त्याला टॉप १० फलंदाजांच्या यादीत स्थान मिळाले आहे.

यॉर्कशायरचा ३० वर्षाचा खेळाडू बेरस्टो हा ऑक्टोबर २०१८ मध्ये नवव्या स्थानावर होता. आणि तो आपल्या क्रिकेट कारकिर्दीत सर्वात जास्त अंक मिळवण्यापासून फक्त २३ अंक दूर आहे. यांच्या व्यतिरिक्त ग्लेन मॅक्सवेल आणि एलेक्स केरी यांच्या शतकीय खेळीमुळे रँकिंग मध्ये चांगलाच फायदा झाला आहे. ग्लेन मॅक्सवेल ५ व्या स्थानावर वर येऊन संयुक्त २६ आणि केरी ११ पायदान वर येत त्यांच्या कारकिर्दीतल्या सर्वात बेस्ट २७ व्या स्थानावर आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अंकुश ढावरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा