गोल पोस्ट स्पॉटलाइट सिनेमा गुडबाय ट्रेलर रिलीज,परफेक्ट फॅमिली ड्रामा आहे अमिताभ बच्चन-नीना गुप्ता आणि रश्मिका मंदान्ना...

गुडबाय ट्रेलर रिलीज,परफेक्ट फॅमिली ड्रामा आहे अमिताभ बच्चन-नीना गुप्ता आणि रश्मिका मंदान्ना चा Goodbye!

मुंबई ,७, सप्टेंबर २०२२ : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सध्या त्यांच्या आगामी ‘गुडबाय’ सिनेमामुळे चर्चेत आहेत. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला असून ट्रेलरला चाहत्यांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे.

चित्रपट उत्तर आणि दक्षिणेतील प्रेक्षकांसाठी खास आहे. गुडबायमधून पुष्पा स्टार रश्मिका मंदाना बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. चित्रपटाचे पोस्टर तसेच ट्रेलर उत्कृष्ट आहेत आणि कुटुंबासोबत पाहण्यासाठी परफेक्ट आहे.

गुडबायच्या ट्रेलरला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटात कौटुंबिक नातं दाखवण्यात आलं आहे. कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहे. भावना, कॉमेडी आणि ड्रामा हे सगळं या कथेत आहे. ट्रेलरमध्ये रश्मिका मंदाना आणि अमिताभ बच्चन यांच्यातील प्रेमाचं भांडण बघायलाच हवे. अमिताभ आणि नीना, ज्या दृश्यात एकत्र आले आहेत. कॉमेडियन सुनील ग्रोव्हर देखील या चित्रपटाचा एक भाग आहे. तो खूप कमी सीन्समध्ये दिसला पण तरीही त्याचा अंदाज जबरदस्त होता. तो चित्रपटातील सरप्राईज पॅकेज आहे असे म्हणू शकतो.

अमिताभ बच्चन आणि रश्मिका मंदान्नाची मुख्य भूमिका असलेला ‘गुडबाय’ हा सिनेमा येत्या ७ ऑक्टोबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. ट्रेलर रिलीज झाल्याने प्रेक्षक आता सिनेमाची आतुरतेनं वाट पाहत आहेत. ‘गुडबाय’ या सिनेमात अमिताभ बच्चन, नीना गुप्ता आणि रश्मिका मंदान्ना महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव

error: Content is protected !!
Exit mobile version