गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान; भारताचे आभार मानत म्हणाले…

सॅन फ्रान्सिस्को, ३ डिसेंबर २०२२ : भारत हा माझाच एक भाग असून तो मी माझ्याजवळ ठेवतो, असे गुगल आणि अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई यांनी म्हटले आहे. भारतीय-अमेरिकन व्यापार आणि उद्योग प्रकारात पिचाई यांना २०२२ साठी पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

५० वर्षीय सुंदर पिचाई यांना सॅन फ्रान्सिस्को येथे शुक्रवारी अमेरिकेतील भारताचे राजदूत तरनजीत सिंग संधू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी पिचाई म्हणाले की, सर्वोच्च पुरस्काराबद्दल मी भारत सरकार आणि भारतीय जनतेचा आभारी आहे. भारत हा माझाच एक भाग आहे. मी जिथे जिथे जातो तिथे तो माझ्यासोबत घेऊन जातो. तंत्रज्ञानाचा लाभासाठी आम्ही एकत्र काम करत असताना गुगल आणि भारत यांच्यातील भागीदारी अशीच सुरू ठेवण्यासाठी मी उत्सुक आहे, असेही ते म्हणाले.

तर अमेरिकेतील भारतीय राजदूत तरणजीत एस. संधू म्हणाले की, गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्याकडे पद्मभूषण सुपूर्द करताना आनंद होत आहे. मदुराई ते माउंटन व्ह्यू हा त्यांचा प्रेरणादायी प्रवास आहे. यामुळे भारत-अमेरिका आर्थिक आणि तंत्रज्ञानातील संबंधांना बळकटी मिळणार आहे, असे त्यांनी यावेळी म्हटले आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा