गुगलने हटवले ११ धोकादायक ऍप….

Google_Play_Store_-_Android_application_storage

मुंबई, १४ जुलै २०२० : भारत-चीन तणावांनातर भारत सरकारने असुरक्षित असलेले तब्बल ५९ चिनी ऍप्सवर बंदी आणली होती. ज्यात टिकटॉक, कॅमस्कॅनर, शेअरइट, हैलो , यासारख्या कोट्यवधी युजर्स असलेल्या ऍप्सचा समावेश होता. आता यावर गुगलने देखील कडक पाऊल उचलले असून स्मार्टफोनच्या माध्यमातून हॅकर्सद्वारे लोकांची होणारी फसवणूक थांबवण्यासाठी ११ ऍप्स हटवले आहेत. तसेच युजर्सला देखील हे ऍप्स तातडीने हटवण्याचा सल्ला दिला आहे.गुगलने ११ अ‍ॅप प्ले स्टोअरमधून हटवले आहेत. हे अँड्रॉईड ऍप्स थेट युझर्सच्या बँक खाते हॅक करु शकतात. ज्या माध्यमातून कधी-कधी क्रेडिट-डेबिट कार्डमधून पैसेही कट् होवू शकतात आणि युझर्सला समजतही नाही.तसेच यामधून युझर्सच्या परवानगीशिवाय त्यांच्या फोनमधून प्रीमिअम सर्व्हिससाठी सब्सक्राईब केले जाते.

२०१७ पासून गुगलचे या अ‍ॅपवर लक्ष होते. हे सर्व अ‍ॅप जोकर मालवेअरपासून इन्फेक्टेड आहेत. या अ‍ॅपला २०१७ ला गुगलने ट्रॅक केले होते. हे सर्व अ‍ॅप अनेक वर्षांपासून गुगलच्या प्ले स्टोअर प्रोटेक्शनच्या नजरेतून स्वत: चा बचाव करत आहेत. युझर्सने किमान पाच लाख वेळा हे अ‍ॅप डाऊनलोड केले आहेत.आता युझर्सलाही हे अ‍ॅप डिलिट करण्यास सांगण्यात आले आहे.या वर्षाच्या सुरुवातीला गुगलने १७०० अ‍ॅपला गुगल प्ले स्टोअरमधून हटवले होते. हे सर्व अ‍ॅप जोकर मालवेअरला इन्फेक्टेड होते.

या ११ ऍपमध्ये चेरी मेसेज (दोन वेगवेगळे ऍप), रिलेक्सेशन मेसेज, मेमरी गेम, लव्हिंग मेसेज, फ्रेंड एसएमएस, कॉन्टॅक्ट मेसेज, कॉम्प्रेस इमेज, ऍप लॉकर, रिकव्हर फाइल, रिमाईंड अलार्म – अलार्म आणि स्टॉपवॉच ऍप या ११ ऍप्स चा समावेश आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा