मुंबई, १५ ऑगस्ट २०२३ : आज भारत आपला ७७ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. संपूर्ण देश स्वातंत्र्याच्या उत्सवात मग्न झाला आहे. भारताच्या या राष्ट्रीय सणानिमित्त गुगलही आकर्षक गुगल डूडलसह या उत्सवात सामील झाले आहे. सर्च इंजिन गुगल, डूडल बनवून भारताचा ७७ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. डूडलचे चित्र देशातील समृद्ध आणि वैविध्यपूर्ण पोशाख परंपरा दर्शवते. नवी दिल्लीतील कलाकार नम्रता कुमार यांनी हे डूडल तयार केले आहे.
गुगल डूडलवर प्रदर्शित केलेले चित्र नवी दिल्लीस्थित कलाकार नम्रता कुमार यांनी रेखाटले आहे. हे चित्र भारत देशाच्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण पोशाख परंपरा दर्शवते. १५ ऑगस्ट १९४७ मध्ये या दिवशी ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतात एक नवीन युग सुरू झाले. स्वातंत्र्याचा हा पहिला दिवस साजरा करण्यासाठी, दरवर्षी दिल्लीतील लाल किल्ल्याच्या तटबंदीवर ध्वजारोहण समारंभ आयोजित केला जातो, ज्यात पंतप्रधान उपस्थित असतात. नागरिक राष्ट्रगीत गातात आणि स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांचे स्मरण करतात.
स्वातंत्र्यसैनिकांबद्दलचे चित्रपट टेलिव्हिजनवर प्रसारित केले जातात. तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात, मुले शाळांमध्ये नाटके आणि स्पर्धांमध्ये भाग घेतात. अनेकांना ही राष्ट्रीय सुट्टी कुटुंब, मित्र आणि प्रियजनांसोबत घालवायला आवडते.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड