कॅट-आय फ्रेम्सची डिझायनर अल्टिना शिनासी यांची आज जयंती, सन्मानासाठी गुगलने बनवले खास डूडल

पुणे, ४ ऑगस्ट २०२३ : गुगल आज अमेरिकन कलाकार, डिझायनर आणि संशोधक अल्टिना शिनासी यांची जयंती साजरी करत आहे. फॅशन आणि आयवेअर डिझाइनमध्ये त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी त्या ओळखले जातात. त्यांचा जन्म आजच्या दिवशी म्हणजेच ४ ऑगस्ट १९०७ रोजी झाला. मॅनहॅटन, न्यूयॉर्क येथे स्थलांतरित पालकांमध्ये जन्मलेल्या अल्टिना शिनासी यांना त्यांच्या जगण्यातील संघर्षाने प्रसिद्ध हार्लेक्विन चष्मा फ्रेम निर्मित करण्यासाठी प्रेरित केले. ज्याची मुळात ‘कॅट-आय’ फ्रेम म्हणून ओळख आहे.

शिनासीला पॅरिसमध्ये चित्रकलेचे शिक्षण घेत असताना कलेची आवड निर्माण झाली. ती न्यूयॉर्कमधील आर्ट स्टुडंट्स लीगमध्ये सामील झाली, जिथे तीने कलाकार म्हणून आपल्या कौशल्य पणाला लावले. तिच्या सर्जनशील प्रवासाला अनपेक्षित वळण मिळाले जेव्हा ती फिफ्थ अव्हेन्यूवरील विविध स्टोअरसाठी विंडो ड्रेसर बनली. या संधीने तीला डिझाइनच्या जगाशी ओळख करून दिली आणि तिला साल्वाडोर डाली आणि जॉर्ज ग्रोझ सारख्या प्रभावशाली कलाकारांसोबत काम करण्याची प्रेरणा दिली.

विंडो डिस्प्ले डिझायनर म्हणून शिनासीच्या काळात कॅट-आय फ्रेमची कल्पना आली. महिलांच्या आयवेअरसाठी स्टायलिश पर्यायांची कमतरता तिला जाणवली. तेव्हा त्यांचा असा विश्वास होता की फ्रेमच्या टोकदार कडा स्त्रीचा चेहरा सुंदर बनवतील. शिनासी प्रयत्न करत राहिल्या आणि जेव्हा एका स्थानिक दुकान मालकाने तीच्या डिझाइनची क्षमता ओळखली तेव्हा तीला यश मिळाले.

हार्लेक्विन चष्मा लोकप्रिय झाला आणि १९३० आणि १९४० च्या दशकात अमेरिकेतील महिलांसाठी एक विशिष्ट आणि अतिशय लोकप्रिय फॅशन बनला. शिनासीच्या शोधामुळे त्यांना १९३९ मध्ये प्रतिष्ठित लॉर्ड अँड टेलर अमेरिकन डिझाइन पुरस्कारासह व्यापक मान्यता मिळाली.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा