गुगलला भारतात १,३३७ कोटींचा दंड, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

नवी दिल्ली, २१ ऑक्टोंबर २०२२: भारतीय स्पर्धा आयोगानं गुगलला १,३३७.७६ कोटी रुपयांचा दंड ठोठावलाय. गुगलने अँड्रॉइड मोबाईल डिव्‍हाइस स्‍पेसमध्‍ये त्‍याच्‍या भक्‍कम असल्‍याचा फायदा घेतलाय, असा आरोप आहे. या कारणास्तव, सीसीआयने स्पष्टपणे म्हटलंय की, गुगलने त्यांचे अनुचित व्यावसायिक क्रियाकलाप थांबवावे आणि निर्धारित वेळेत तोडगा काढावा.

अलीकडंच भारतात Apple, Google, Amazon, Netflix आणि Microsoft यांना नोटीस जारी करण्यात आली होती. डिजिटल क्षेत्रातील स्पर्धाविरोधी कारवायांमध्ये या कंपन्या गुंतल्या असून त्याची चौकशी करणं आवश्यक असल्याचं सांगण्यात आलं. याच तपासासाठी भारतात यंत सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली अर्थविषयक संसदीय स्थायी समितीही स्थापन करण्यात आली होती. ही समिती स्पर्धेच्या विविध पैलूंवर सखोल तपास करत होती.

येथे हे समजून घेणं आवश्यक आहे की Google Android OS (ऑपरेटिंग सिस्टम) चालवते आणि व्यवस्थापित करते. इतर कंपन्यांना जे परवाने दिले जातात तेही गुगलनेच केले आहेत. तपासादरम्यान समितीला असेही आढळून आले आहे की अॅपल आणि अँड्रॉइडमध्ये काही प्रमाणात स्पर्धा आहे, परंतु ती केवळ खरेदीच्या वेळीच दिसून येते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा