गोल पोस्ट आंतरराष्ट्रीय गुगलकडून २०१९ चे ट्रेंड जाहीर

गुगलकडून २०१९ चे ट्रेंड जाहीर

नवी दिल्ली : इंटरनेटच्या माध्यमातून या गुगलने पाहता पाहता सर्वांच्या आयुष्य़ात कायमस्वरुपी स्थान मिळवले आहे. परंतु तुम्हाला गुगुलच्या बाबतीत असणाऱ्या या गोष्टी माहीत आहेत का? त्याला कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात? त्यातही भारतीयांकडून गुगलकडे कोणत्या प्रश्नांची सर्वाधिकी विचारणा होते. याविषयी कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे? Google कडून २०१९ या वर्षातील काही Trends जाहीर करण्यात आले आहेत.

Google Trends नुसार, यंदाच्या वर्षी ज्या पाच महत्त्वाच्या मुद्द्यांविषयी गुगलवर शोध मोहिमा राबवल्या गेल्या आहेत. त्यामध्ये पहिल्या स्थानावर होता क्रिकेट विश्वचषक Cricket World Cup. दुसऱ्या क्रमांकावर होती लोकसभा निवडणूक, तर तिसऱ्या क्रमांकावर होतं महत्त्वाकांक्षी चांद्रयान २. गुगलवर सर्वाधिक शोधल्या गेलेल्या विषयांमध्ये चौथ्या क्रमांकावर अभिनेता शाहिद कपूर याचा चित्रपट ‘कबीर सिंग’ होता. तर पाचव्या क्रमांकावर हॉलिवूड चित्रपट Avengers-End Gameला स्थान मिळालं आहे. या गोष्टी सर्वात जास्त गुगलवर २०१९ साली बघितल्या गेल्या आहेत.

error: Content is protected !!
Exit mobile version