पिंपरी-चिंचवड पोलिसांचा ‘मास्टरस्ट्रोक’! Google Map वर पत्ता शोधून फिल्मी स्टाईलने घरफोड्या करणारी टोळी गजाआड!

14
Pimpri Chinchwad robbery
पिंपरी-चिंचवड पोलिसांचा 'मास्टरस्ट्रोक

Pimpri-Chinchwad police arrest thieves using Google Maps: पिंपरी-चिंचवड शहरात घरफोड्यांची मालिका सुरु होती आणि पोलिसांना या चोरांना पकडण्याचं मोठं आव्हान होतं. पण म्हणतात ना, ‘चोर कितीही माजोरला असला तरी पोलिसांच्या तावडीतून सुटत नाही!’ अगदी त्याचप्रमाणे, गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी फिल्मी स्टाईलने घरफोड्या करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे, हे चोरटे चोरी करण्यासाठी Google Maps चा वापर करत होते!

सलीम सिकंदर शेख (वय ५८) आणि अजित अर्जुन पिलई (वय ४२, दोघेही रा. वांगणी गोरेगाव, ठाणे) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या टोळीची Modus Operandi ऐकून पोलिसही चक्रावून गेले होते. हे चोरटे Google वर कमर्शियल ऑफिसेसचा पत्ता शोधायचे, मग काही दिवस त्या ऑफिसची रेकी करायचे आणि संधी मिळताच फिल्मी स्टाईलने चोरी करायचे.

चोरी करण्यासाठी हे चोरटे ठाणे येथून पिंपरी-चिंचवडपर्यंत बस आणि रिक्षासारख्या सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर करत होते. इतकंच नव्हे, तर चोरी करताना कोणालाही संशय येऊ नये म्हणून ते त्यांचे मोबाईल फोनही बंद ठेवत असत!मात्र, म्हणतात ना ‘कानून के हाथ लंबे होते है!’ अखेर पोलिसांच्या तपासाच्या जाळ्यात हे चोरटे अलगद अडकले.काळेवाडी पोलिसांनी ६ एप्रिल रोजी एका कमर्शियल ऑफिसमधील चोरीच्या घटनेचा तपास सुरु केला होता. गुन्हे शाखा युनिट चारचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद पवार आणि त्यांच्या टीमने तब्बल ४०० सीसीटीव्ही फुटेज खंगळले. अथक प्रयत्नांनंतर २० एप्रिल रोजी पोलिसांना हे चोरटे काळेवाडी परिसरात संशयितरित्या फिरताना दिसले.

पोलिसांनी तत्काळ दोघांनाही ताब्यात घेतले आणि कसून चौकशी केली. चौकशीदरम्यान दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी या चोरट्यांकडून २ लाख ९८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी अजित पिलई हा उच्चशिक्षित आहे, हे ऐकून तर पोलिसही थक्क झाले. शिक्षण असूनही त्याने गुन्हेगारीचा मार्ग निवडला. तर, दुसरा आरोपी सलीम शेख हा तर रेकॉर्डब्रेकर चोर आहे. त्याच्या नावावर मुंबईत तब्बल ६२ घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत आणि न्यायालयाने त्याचे १० नॉन बेलेबल वॉरंट जारी केले आहेत. यावरूनच त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी किती मोठी आहे, याचा अंदाज येतो. अजित पिलईच्या विरोधातही २० गुन्हे दाखल आहेत.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद पवार यांच्या नेतृत्वाखालील उपनिरीक्षक मयूरेश साळुंखे, सहायक उपनिरीक्षक संजय गवारे, आदिनाथ मिसाळ आणि त्यांच्या टीमने ही यशस्वी कामगिरी केली. या कारवाईमुळे पिंपरी-चिंचवड शहरातील घरफोडीच्या घटनांना काही प्रमाणात आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी या चोरट्यांना अटक करून दाखवून दिलंय की, ‘गुन्हेगार कितीही शातिर असला तरी कायद्याच्या तावडीतून सुटणं मुश्किलच नव्हे, तर नामुमकिन आहे!’

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे