गुगल ने केले व्हॉइस रेकॉर्डिंग अप्लिकेशन लॉन्च

Google ने नुकताच स्मार्टफोट लाँच केला. या स्मार्टफोनसोबतच गुगलने Recorder नावाचे एक व्हॉइस रेकॉर्डिंग अ‍ॅपही लॉन्च केले. हे अ‍ॅप Google च्या पिक्सल 4 स्मार्टफोनवर उपलब्ध आहे. हे अ‍ॅप आवाज ऐकून पटपट लिहून काढते.

हे रेकॉर्डर स्पीच प्रोसेसिंग व रिकग्निशनवर काम करते. त्यामुळे हे अ‍ॅप त्याच वेळी पटपट लिहिते. यामुळे फोनमध्ये व्हॉइस रेकॉर्डींगची युजर्सची पद्धत बदलणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

विशेष
व्हाइस रोकॉर्डिंग सहज टेक्स्टमध्ये बदलवता येणार आहे. विशेष म्हणजे काम करण्यासाठी इंटरनेट कनेक्शनची गरज नाही. हे अ‍ॅप थेट डिव्हाइसवर काम करते. युजर्स हे एअरप्लेन मोडवर वापरू शकतात.

हे अ‍ॅप विशिष्ट आवाज, शब्द व म्हणीही ओळखू शकते. मात्र हे अ‍ॅप फक्त इंग्रजी भाषेतच काम करत आहे. लवकरच ते इतर भाषांनाही सपोर्ट करील.असे गूगल कडून सांगण्यात आले आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा