गोल पोस्ट महाराष्ट्र गोपीनाथ गडावर भाषणाआधी पंकजा मुंडेंचा गौप्यस्फोट

गोपीनाथ गडावर भाषणाआधी पंकजा मुंडेंचा गौप्यस्फोट

मुंबई : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आज गोपीनाथ गडावरून राजकीय भूकंप घडवणार असे संकेत दिले होते. पण, त्याआधीच त्यांनी भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधला आहे.

पीटीआय वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, विधानसभा निवडणुकीदरम्यान उमेदवारांना तिकीटांचे वाटप करण्यात आले होते. पण, काही उमेदवारांना तिकीट नाकारण्यात आले होते. तिकीट न देण्याचा निर्णय हा दिल्लीत नसून महाराष्ट्रातच घेण्यात आला होता, असा गौप्यस्फोट पंकजा मुंडे यांनी केला आहे.
तसंच विधानसभा निवडणुकीत भाजपने १०५ जागा जिंकल्या आहे. देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या या खराब कामगिरीची जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असंही पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version