गोपीनाथ मुंडेंना पक्षातून काढण्याचा भाजपचा डाव होता: शेंडगे

मुंबई : गोपीनाथ मुंडे यांना पक्षातून काढण्याचा ठराव भाजपने मांडला होता. मात्र आम्ही त्याला वेळीच विरोध केल्याने तो ठराव फेटाळून लावला गेला, असा गंभीर आरोप भाजपचे माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी केला आहे.

भाजपने कायम ओबीसी नेत्यांना संपवण्याचा डाव आखला आहे. जो प्रकार गोपीनाथ मुंडेंसोबत भाजपने केला तसाच प्रकार पंकजा मुंडे सोबत केला जात आहे. पंकजा मुंडे यांना परळीतून भाजपनेच पाडले. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी वेळीच निर्णय घ्यावा, असा सल्ला प्रकाश शेंडगे यांनी पंकजा मुंडेंना दिला आहे.

मी भाजपची प्रामाणिक कार्यकर्ती आहे. मी पक्षासाठी काम केलंय आहे, असं म्हणत पंकजा मुंडेंनी पक्षांतराच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

दरम्यान, प्रकाश शेंडगे यांनी २०१४ मध्ये भाजपशी रामराम करत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यानंतर धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यांनी राष्ट्रवादीचा राजीनामा देत ओबीसी संघटनेची बांधणी सुरू केली.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा