गोपीनाथगड ते भगवानभक्ती रॅलीला प्रीतम मुंडेंकडून सुरुवात

बीड, ५ ऑक्टोबर २०२२ : महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर प्रथमच शिंदे ठाकरे यांच्या वादाने शिवसेनेचे दोन दसरा मेळावे मुंबईमध्ये होत आहेत. त्यामुळे राज्यातले वातावरण ढवळून निघाले आहे. तर बीडमध्ये भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या भगवान भक्ती गडावरील दसरा मेळाव्याला सुरुवात झाली आहे. बीडच्या परळी येथील गोपीनाथ गडावर नतमस्तक होवून पंकजा मुंडे यांच्या भगिनी खा डॉ प्रीतम मुंडे यांनी गोपीनाथगड ते भगवानभक्ती पदयात्रा सुरुवात केली आहे.

दरम्यान पंकजा मुंडे या हेलिकॉप्टरने भगवान भक्ती गडावर सभास्थळी दाखल होणार आहेत. प्रीतम मुंडे यांची पदयात्रा बीड,सिरसाळा, दिंद्रुड, तेलगाव, वडवणी, घाटसावळी, बीड, पाटोदा मार्गे सावरगाव येथे भगवान भक्ती गडावर पोहोचणार आहेत. दुपारी १२ च्या दरम्यान पंकजा मुंडे भगवान भक्ती गडावर येतील. त्यानंतर प.पू. राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे.

यानंतर पंकजा मुंडे मेळाव्याला संबोधित करणार आहेत. पंकजाताई काय बोलणार याविषयी विचारले असता प्रीतम मुंडे म्हणाले महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरून दसरा मेळाव्यासाठी लोक येत आहेत. आज मेळाव्यात पंकजाताई काय बोलणार यांची मलाही उत्सुकता आहे. लोकस्वयंस्फूर्तीने येतात त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून दसरा मेळावा समिती कडून काळजी घेण्यात येत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा