रायगडमधील गोरेगाव भाजप विभागाकडून पक्षाच्या नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांचा सत्कार सोहळा संपन्न

रायगड १७ डिसेंबर २०२३ : महाड विधानसभा क्षेत्रांत येणाऱ्या माणगांव तालुक्यातील गोरेगाव गाव विभागातील भारतीय जनता पार्टीच्या नवनिर्वाचित सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार समारंभ तसेच विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा भाजप पक्ष प्रवेश सोहळा आणि नविन पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र वाटप कार्यक्रम १६ डिसेंबर रोजी गोरेगाव विभाग भाजप कडून आयोजित करण्यात आला होता. यावेळी नागाव ग्राम पंचायत सरपंच यशवंत कासरेकर, ग्रामपंचायत उपसरपंच अक्षय माने, ग्राम पंचायत सदस्य जानव्ही भोईर, दीप्ती मोरे, स्मरणिका जुमारे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच गोरेगाव मधील कुंभारवाडा गावाचे सल्लागार प्रकाश रातवडकर, चंद्रकांत पंदेरकर, दिनेश रातवडकर, सचिन बामनोलकर, समीर गोविलकर, समीर रातवडकर, महादेव रातवडकर, संदीप म्हाप्रळकर, गणपत म्हशेलकर यांच्या उपस्थितीत किशोर पांडुरंग रातवडकर यांचा काही प्रमुख पदाधिकारी व समर्थक कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश झाला.

हा कार्यक्रम भाजप महाड विधानसभा प्रमुख तथा जिल्हा सरचिटणीस बिपीन म्हामुणकर यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा उपाध्यक्ष भालचंद्र (नाना) महाले, तालुका सरचिटणीस युवराज मुंढे,महाड ता. सरचिटणीस अजित येरुणकर, महाड विधानसभा विस्तारक विश्वतेज भोसले, वाॅररूम प्रमुख तथा म.मोर्चा उपाध्यक्षा महाड अदिती ताडफळे, सागर हिरवे, अशोक यादव, अश्विनी यादव, निलेश राशिनकर, प्रसाद महाडिक, अभिजित महाले, किशोर पवार, यश माने, रोशनी जाधव, रविंद्र मुंढे,किसन शिंदे,भागुराम भोईर, विरन भोईर, जयेश कासरेकर,राजेंद्र मोरे, मारुती कासरेकर, जॉन मोरे, शिवा कासरेकर, मंगेश महादे, सखाराम दळवी, सदानंद हाटे, सचिन सत्वे यांच्या उपस्थितीत पार पडला.

यावेळी गोरेगाव शहरातील किशोर पांडुरंग रातवडकर यांची गोरेगाव शहर अध्यक्ष पदी नियुक्ती झाली, प्रसाद महाडिक यांची शहर उपाध्यक्ष पदी नियुक्ती झाली. तसेच अभिजीत महाले यांची शहर सरचिटणीसपदी नियुक्ती झाली. भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस बिपिन म्हामुणकर यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रमोद जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा