गोरगरिबांना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते अन्नधान्य किटचे वाटप

इंदापूर, दि. १९ जून २०२०: करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळे लोकांना रोजगार उपलब्ध नसल्यामुळे त्यांना हातभार लावण्यासाठी हातावर पोट असलेल्या लोकांची अडचणी दूर करण्यासाठी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पुढाकार घेतला असून त्यांच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यात आतापर्यंत वीस हजार लोकांना अन्नधान्य किट्सचे वाटप करण्यात आले.

भिगवण स्टेशन येथे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री तसेच सोलापूर जिल्ह्याचे पालक मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून गरिब व गरजु लोकांना अन्नधान्य किट्स, मास्क, अर्सेनिक अल्बम ३० या होमिओपॅथिक औषधांच्या ५०० डब्या असे सर्व साहित्य वाटप करण्यात आले.

या वेळी मोहोळ तालुक्याचे आमदार यशवंत माने, जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दत्तात्रय फडतरे, आबासाहेब देवकाते, सरपंच अनिता संतोष धवडे, उपसरपंच ललिता जाडकर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन बोगावत, माजी सरपंच हेमताई माडगे, डॉ.चंद्रकांत खानावरे, डॉ.संकेत मोरे, आदी उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा