गोल पोस्ट आंतरराष्ट्रीय गोटाबाया राजपक्षे श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती

गोटाबाया राजपक्षे श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती

नवी दिल्ली: श्रीलंकेच्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत गोटाबाया राजपक्षे विजयी झाले आहेत. ते श्रीलंकेचे आठवे राष्ट्रपती म्हणून शपथ घेणार आहेत.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोटाबाया राजपक्षे यांना ही निवडणूक जिंकल्याच्या पार्श्वभूमीवर ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या आहेत.
भारत व श्रीलंका या दोन्ही देशातील संबंध वाढवण्यासाठी शांती, समृद्धी व सुरक्षा क्षेत्रात मिळून काम करण्याची आशा मोदींनी व्यक्त केली आहे.
या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या रिंगणात ३५ उमेदवार होते. मात्र, खरी लढत ही गोटाबाया राजपक्षे व सजित प्रेमदासा यांच्यात पाहायला मिळाली.

error: Content is protected !!
Exit mobile version