११ फेब्रूवारी रोजी नागपूरमध्ये गोटूल सदस्यांचा मेळावा

नागपूर, ४ फेब्रुवारी २०२४ : गोटूल हे आदीवासी जमातीचे गुरूकल आहे. गोटूल सदस्यांचा मेळावा हा सामाजिक एकात्मतेचे प्रतीक आहे. या संकल्पनेतून गोटूल एक अनोखी परंपराचे आयोजन नागपूर शहरातील बाकडे सभागृह येथे ११ फेब्रूवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. हा आदीवासी युवकांच्या विचारांची, सांस्कृतिक मूल्यांची, ज्ञानाची देवाणघेवाण करण्यासाठी आणि जीवनसाथी शोधण्यासाठीचा पारंपरीक सांस्कृतिक कार्यक्रम आहे. या आयोजनाच्या माध्यमातून युवा युवतीचा परिचय मेळावा, आदिवासी युवा युवती Tribal youth Interaction तसेच Doctors Get-Together होणार आहे. ज्ञान, कल्पना आणि आपल्या सांस्कृतिक मूल्यांची देवाणघेवाण करण्यासाठी तरूणांना आमंत्रित करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ. राजेंद्र प्रसाद सुरपाम उपअधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय चंद्रपूर अधिक्षक, डॉ. पुरूषोत्तम मडावी उपसंचालक तथा संचालक राज्य व कुटूंब कल्याण संस्था, नागपूर,विशेष अतिथी श्री. रविंद्र ठाकरे अप्पर आयुक्त, आदिवासी विकास विभाग नागपूर, डॉ. आशुतोष पातुरकर, डिन अँकेडेमिक, ग्रीन हेवन इन्स्टिट्यूट ऑफ मँनेजमेंट अँड रिसर्च नागपूर, मेघना कुमरे आहार तज्ञ, बळवंत कोवे विभाग प्रमुख विकृती शास्त्र, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, प्रमुख मार्गदर्शक ज्येष्ठ लेखिका कवयित्री श्रीमती उषा किरण आत्राम या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाद्वारे आदिवासी तरूण तरूणीसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येत आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : नीता सोनवणे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा