सरकारची फार्मा इंडस्ट्रीसोबत बैठक; महागड्या औषधांपासून जनतेला मिळू शकतो दिलासा

नवी दिल्ली: २६ जूलै २०२२: देशात लोकांना चांगली आणि स्वस्त औषधे सहज मिळावीत, यासाठी केंद्र सरकार अनेक दिवसांपासून प्रयत्न करत आहे. दरम्यान,औषधांचा किमतींबाबत केंद्र सरकारने पुन्हा एकदा फार्मासोबत मोठी बैठक घेतली आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत औषधांच्या मार्जिनबाबत केंद्र आणि कंपन्यांमध्ये चर्चा झाली आहे. महागडी औषधे सर्वसामान्यांना सहज उपलब्ध व्हावीत, यासाठी मोदी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे.

पहील्या टप्प्यात केंद्र सरकार हृदयविकार आणि शुगरच्या औषधांमध्ये याची अंमलबजावणी करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सरकार आणि फार्मा इंडस्ट्री या दोघांनीही आपापल्या मागण्या एकमेकांसमोर मांडल्या आहेत.

केंद्र सरकार औषध कंपन्यांना मोठा दिलासा देऊ शकते. बैठकीशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार कंपन्यांना आधूनिकीकरणासाठी मशिन्स ऑर्डर करण्यावर सूट देण्याचा विचार करु शकते.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा