भारत सरकार, जागतिक बँकेने एमएसएमई आपत्कालीन प्रतिसाद कार्यक्रमासाठी ७५० दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचा केला करार

नवी दिल्ली, ७ जुलै २०२० : आपल्या एमएसएमई आपत्कालीन प्रतिसाद कार्यक्रमासाठी भारत सरकारने जागतिक बँकेबरोबरच्या ७५० दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. कोविड -१९ च्या संकटामुळे जबरदस्त परिणाम झालेल्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) वित्तपुरवठा वाढविणे हे त्याचे लक्ष्य आहे.

जागतिक बँकेचा एमएसएमई इमर्जन्सी रिस्पॉन्स प्रोग्राम सध्याच्या अार्थिक धक्क्याचा परिणाम रोखण्यासाठी आणि कोट्यावधी नोकर्‍या सुरक्षित ठेवण्यासाठी सुमारे १.५ दशलक्ष व्यवहार्य एमएसएमईच्या तत्काळ तरलता आणि पत गरजा लक्षात घेईल.

वित्त मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, एमएसएमई क्षेत्राला काळानुसार चालविण्यासाठी आवश्यक असलेल्या व्यापक सुधारणांमधील ही पहिली पायरी आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा