मुंबई, १ नोव्हेंबर २०२२: राज्यातील मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानं सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप रोजच होतायत. यामुळं राज्यातील राजकारण पुर्णपणे ढवळून निघालंय. पण या सगळ्यामध्ये महाराष्ट्रातील जनतेला विचार पडला आहे की, खरं कोण खोटं कोण याबाबत लोकांमध्ये संभ्रम आहेत.
आता महाराष्ट्र सरकारने सर्व प्रकल्पांची श्र्वेत पत्रिका काढणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिलीय. पुर्वी आणलेले प्रकल्प आम्हीच आणले असं मी कधीही म्हटलं नाही. उलट मी असं सांगितलं गाजावाजा करत जे झाले त्यांची अमंलबजावणी का झाली नाही.
महाविकास आघाडी कडून याआधी कॅबिनेट सब कमिटीची मीटींग चौदा महिने का झाली नाही? अशी विचारणा करत उदय सामंत यांनी आधीच्या सरकारवर ताशेरे ओढले. तर आदित्य ठाकरेंवर निशाना साधलाय.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर