इंदापूर तालुक्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाची पाहणी करून शासनाने तातडीने मदत करावी – तानाजी धोत्रे

3

इंदापूर, १७ ऑक्टोबर २०२० : बुधवारी दिनांक १४ रोजी राज्यभरात इंदापूर तालुक्यात पावसाने कहर माजविला होता यामध्ये अनेकांचे संसार पाण्यात गेले तर काहींना आपला जीव गमवावा लागला पूर परिस्थिती निर्माण झाल्याने इंदापूर तालुक्यांमध्ये अनेकांचे शेती शेतमाल आणि जनावरांची हानी झाली. झालेल्या नुकसानाची राज्य शासनाने तातडीने दखल घेऊन नुकसानग्रस्तांना तातडीने मदत करण्याची मागणी भटक्या-विमुक्त जमातीचे नेते तानाजी धोत्रे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
कोरोनामुळे अगोदरच नागरिक जेरीस आले आहेत अनेकांना आपला रोजगार व्यवसाय गमवावा लागला आहे त्यातच या अस्मानी संकटाने पुढे जगायचे कसे हा प्रश्न निर्माण केला आहे त्यामुळे शासनाने तातडीने पंचनामे करून बाधितांना तात्काळ मदत मिळावी यासाठी भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे प्रदेश सरचिटणीस तानाजी धोत्रे यांनी इंदापूर तहसीलदार यांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

प्रतिनिधी निखिल कणसे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा