कोटा येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना आणण्याची शासनाने व्यवस्था करावी अंकिता पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

इंदापूर : कोटा (राजस्थान) येथे शिक्षणासाठी गेलेले राज्यातील हजारो विद्यार्थी ‘लॉकडाऊन’ मुळे त्याठिकाणी अडकून पडले आहेत. कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे वेगवेळ्या राज्यांमध्ये शिक्षणासाठी गेलेले विद्यार्थीही अडकले आहेत.
मागील महिन्यापासून हे विद्यार्थी तेथे अडकून पडले आहेत. यातील काही विद्यार्थी वसतिगृह, खाजगी खोल्या येथे राहत आहेत. लॉकडाऊन त्यामुळे सर्व हॉटेल्स बंद आहेत, त्यामुळे या विद्यार्थ्यांचे भोजन व इतर गोष्टींचे हाल होत आहेत.
त्या अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांना मुळ गावी आणण्याची शासनाने व्यवस्था करावी ही विनंती जिल्हा परिषद सदस्या अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

उत्तर प्रदेश सरकारने ज्याप्रमाणे त्यांच्या राज्यातील विद्यार्थ्यांना आणण्याची व्यवस्था केली त्या पार्श्वभूमीवर आपल्या राज्यातील विद्यार्थ्यांना देखील कोटा येथून त्यांच्या मुळ गावी आणण्यासाठी शासनाने व्यवस्था करावी , अशी मागणी त्यांनी केली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: योगेश कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा