देशातील या राज्यात पेट्रोल चे दर कमी करण्याचा सरकारचा निर्णय……

7

नागालँड, २४ फेब्रुवरी २०२१: दोन दिवस शांततेनंतर देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आज पुन्हा वाढल्या. दिल्लीत पेट्रोल मंगळवारी २५ पैशांनी वाढून ९०.८३ रुपयांवर गेले. डिझेल देखील ३५ पैशांनी वाढून ८१.३२ रुपये प्रति लिटरवर आले. सोमवारी ब्रेंट क्रूड ६५ डॉलर प्रति बॅरलवर गेला.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असल्याने जनताजनार्दन नाराज आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये सातत्याने वाढ होत आहे. हे लक्षात घेता नागालँडमध्ये पेट्रोलवरील कर दर २९.८० टक्क्यांवरून २५ टक्क्यांवर करत १८.२६ रुपये ते प्रतिलिटर १६.०४ रुपये करण्यात आला आहे. तर,डिझेलसाठी कराचा दर ११.०८ रुपयांवरून १०.५१ रुपये प्रति लीटर आणि १७.५०, १६.५० टक्के करण्यात आला आहे.

दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. कच्च्या तेलाची गरज असलेल्या देशाची ८९ टक्के आयात देशातून होते.

प्रत्येक राज्यात पेट्रोल आणि डिझेलवरील करांचे वेगवेगळे दर आहेत. १८ फेब्रुवारी रोजी ब्रेंट क्रूडचे आंतरराष्ट्रीय बेंचमार्क प्रति बॅरल ६५.०९ डॉलर होते (सुमारे १५९ लिटर). ही किंमत ऐतिहासिकदृष्ट्या एप्रिल २०२०मध्ये सर्वात कमी होती १९ डॉलर प्रति बॅरल.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा