तृतीय वर्षातील अनिर्णित निकालाबद्दल राज्यपाल हटाव मोहीम : सौ निशा बिडवे

सोलापूर, दि. १७ जून २०२०: महाराष्ट्र राज्याच्या विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या तृतीय वर्षातील न घेण्यात येणाऱ्या अनिर्णित निकालाबद्दल राज्यपाल हटाव मोहीमे संदर्भातील निवेदन महा विकास आघाडीचे सर्वेस्व मा.ना.शरदचंद्रजी पवार साहेब व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. ना.उद्धवजी ठाकरे साहेब व युवकांचे हृदय प्रेमी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना ग्रॅज्युएट फोरम ऑफ महाराष्ट्राच्या राज्याध्यक्षा सौ निशा बिडवे यांच्यावतीने ई-मेल द्वारे निवेदन सुपूर्त करण्यात आले.

कोरोना सारख्या संसर्ग रोगाने संपूर्ण महाराष्ट्रभर थैमान घातले असल्यामुळे शारीरिक अंतर ठेवण्यासाठी व सुरक्षित राहण्यासाठी म्हणून राज्यशासनाने तीन महिन्यांहून अधिक काळापासून लॉकडाऊन सुरू ठेवावा लागला असता अशातच संपूर्ण राज्यातील शाळा-कॉलेज बंद ठेवण्यात व शालेय विद्यार्थी यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यामुळे इयत्ता १० च्या विषयाचा उर्वरित राहिलेला पेपर न घेता त्यांचा बेस्ट ऑफ फाईव्हचा अवलंब करून त्यांचा निकाल लावण्याचे सरकार व प्रशासकीय अधिकारी यांच्याकडून अद्यादेश निर्गमित करण्यात आले. पण कॉलेजात शिकणाऱ्या विध्यार्थ्यांचे भविष्य मात्र अंधारातच दिसून येत आहे.

त्यामुळे विद्यापीठाअंतर्गत तृतीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेसंदर्भात व त्यांच्या निकाला संदर्भातील योग्य तो अहवाल राज्यातील विद्यापीठा अंतर्गत आपापल्यापरीने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांच्या सुचनेनुसार अहवाल राज्यशासनाकडे सादर करून तो अंतिम निर्णयासाठी राज्यपाल महोदय यांच्याकडे रितसर सादर करण्यात आला आहे. तरी आपल्या राज्याच्या मा.ना. राज्यपाल महोदयांनी याकडे केराची टोपली दाखवत अद्यापही निर्णयाला सूतोवाच दिला नाही. त्यामुळे संपूर्ण राज्यातील कोलेज कुमार म्हणून संबोधीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्याच्या वाटेवर जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यात संतापाचे व नैराश्याचे वातावरण निर्माण झाले.

अशा प्रसंगात विद्यार्थी स्वतःच्या जीवाचे बरे वाईट सुद्धा करण्यास मागे पुढे पाहत नसत त्यामुळे महिन्याहून अधिक काळ उलटून गेला व नवीन शैक्षणिक वर्षास सुरुवात झाली असताही मा.ना.राज्यपाल महोदयांनी अद्यापपर्यंत कोणताही निर्णय हाती घेतला नसल्यामुळे संपूर्ण विद्यार्थ्यांत राज्यपाल हटाव या धोरणाचे चिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे असे स्वार्थी व सुडाचे राजकारण करणारे या अशा एवढ्या मोठ्या महामारीच्या प्रसंगात ही सरकारला मदत न करता त्यांच्या विरोधात कार्य करणाऱ्या मा.ना.राज्यपाल महोदयांना त्यांच्या खुर्चीवर बसण्याचा अधिकार निर्माण होत नसल्यामुळे अशा मा.ना.राज्यपाल महोदय यांच्या खुर्चीहुन व त्यांच्या पदाचा अपमानास्पद घटना घडू नये यासाठी ग्रॅज्युएट फोरम ऑफ महाराष्ट्रच्या राजाध्यक्षा – निशा बिडवे यांच्या वतीने राज्यपाल हटाओ ही मोहीम हाती घेण्यात येणार आहे.

यासाठी लवकरात लवकर दोन ते तीन दिवसात निर्णय लावण्यात यावा अथवा संपूर्ण राज्यात लॉकडाऊन असतानाही शारीरिक अंतराचा वापर करून व कोविड -१९ या कायद्याचे उल्लंघन न करता रस्त्या-रस्त्यावर उतरून राज्यपाल हटाव ही नारेबाजी केली जाईल असे आपणास विनंतीपूर्वक सूचित करण्यात येते की महाराष्ट्र राज्याचे युवा ह्रुदयप्रेमी माननीय आदित्य ठाकरे व महाराष्ट्र राज्याचे एक जबाबदार व कर्तुत्ववान मुख्यमंत्री म्हणून आपली ख्याती सन्मानास्पद आहे. त्यामुळे आपण अशा
अ-उचित निर्णयाबद्दल आम्हास आपण योग्य तो निर्णयास्पद योग्य तो न्याय द्याल ही आपणास सर्वसामान्य व गोरगरिबांच्या शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वतीने कळकळीची विनंती करण्यात आल्याचे निवेदन ग्रॅज्युएट फोरम ऑफ महाराष्ट्राच्या वतीने देण्यात आले.

न्यूज अनकट प्रतिनिधी- प्रदिप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा