पदवीधर आ. अरुण लाड यांचा माढा तालुक्याच्या वतीने सन्मान

माढा, ६ फेब्रुवरी २०२१: पुणे पदवीधर मतदार संघातून महाविकासआघाडी कडून अरुण लाड विजयी झाल्याबद्दल सोलापूर जिल्ह्यात आमदार अरुण लाड यांचा आभार दौरा होता. यानिमित्ताने रोटरी हाॅल टेंभुर्णी येथे आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्ष आ. बबनराव शिंदे होते.माढा तालुक्याच्या वतीने महाविकास आघाडीतर्फे लाड यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी आमदार बबनराव शिंदे म्हणाले, पाचही जिल्ह्यांमध्ये महाविकासआघाडीने एक दिलाने काम केल्यामुळे अरुण लाड यांचा विजय भरघोस मतांनी झाला. मागील इलेक्शन मध्ये आपण लाड यांना उमेदवारी मिळवण्यात कमी पडलो.यावेळी आम्ही शरदचंद्र पवार साहेबांना विनंती केली की अण्णांना तिकीट द्या. त्यांच्या विरोधात कोणीही असू द्या एक दिलाने काम करून विजय मिळवू आणि आ संजय मामा शिंदे मी व आ. अरुण लाड यांना दिलेला शब्द पाळला. त्यानां विधान परिषदेमध्ये पदवीधरांच्या न्याय हक्कासाठी पाठवले यासाठी सोलापूर जिल्ह्यातून भरघोस मतदान झाल्यामुळे मतदारांचा मी आभारी आहे. तसेच अरुण लाड व मी शिक्षकांचे व पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

मागील पाच वर्षात पुणे पदवीधर मतदार संघाच्या उमेदवाराने कोणतेही प्रश्न सोडवले नाहीत तर नागपूर पदवीधरची आम्हाला जागा कधीही जिंकता आली नव्हती. परंतु, महाविकासआघाडी प्रणित काँग्रेसच्या उमेदवाराने यावेळेस विजय मिळवला व त्या ठिकाणी बदल घडवून आणला.

विठ्ठलराव शिंदे कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. महेंद्र कदम म्हणाले शिक्षकांचे प्रश्न प्रचंड प्रमाणात आहेत. ते सोडविण्याचे काम आपल्यालाच करावे लागणार आहे. ते आपण सोडवाल. गवंड्याला तीनशे ते चारशे रुपये पगार मिळतो परंतु, प्राथमिक शिक्षकाला शिक्षण सेवक म्हणून महिना चार हजार रूपयावर तीन वर्षे काम करावे लागते. तर कित्येक विनाअनुदानित शिक्षक तर वीणा पगारी निवृत्त झाले आहेत. शिक्षकांचे व पदवीधरांचे खूप मोठे प्रश्न आहेत ते आपणापुढे मोठे आव्हान असून आपण सोडवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो.

माढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निरीक्षक आर डी पवार म्हणाले, पदवीधरांसाठी स्वतंत्र प्रणाली आपण राबवावी जेणेकरून आपली ओळख संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निर्माण होईल.

पुणे पदवीधर मतदार संघाचे आ अरुण लाड सत्काराला उत्तर देताना म्हणाले आपणा सर्वांचे प्रेम पाहून मी भारावून गेलो आहे. पदवीधर मतदारसंघावर आजपर्यंत विशिष्ठ लोकांची मक्तेदारी होती परंतु, या वेळी आपण सर्वांनी मदत केली त्यामुळे महाविकास आघाडीने एक दिलाने प्रयत्न केल्याने आज आपला विजय निश्चित झाला. महाराष्ट्रामधे महाविकास आघाडीला शिक्षक व पदवीधर मध्ये एक जागा वगळता सर्व जागा मिळाल्या. दोन वेळा निवडून देऊन सुद्धा मागील उमेदवाराने साधे शिक्षकांचे प्रश्न सुद्धा माहिती करून घेतले नाहीत. यामधे पदवीधर महिलांचे योगदान महत्त्वाचे आहे.

यावेळी कार्यक्रमाचे प्रस्ताविक जिल्हा दुध संघाचे मा. संचालक शिवाजीराव पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन राष्ट्रवादी काँग्रेस माढा विधानसभा अध्यक्ष रमेश पाटील यांनी केले.

यावेळी पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार अरुण लाड, आमदार बबनराव शिंदे, आमदार संजय मामा शिंदे, शिवसेना तालुकाप्रमुख मधुकर देशमुख, माढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा अध्यक्ष रमेश पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी बंडू नाना ढवळे, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भोसले, जि. दुध संघाचे मा.संचालक शिवाजीराव पाटील, भीमराव बरगंडे, रामभाऊ शिंदे, शेकाप नेते अँड बाळासाहेब पाटील, शिवसेना शहर प्रमुख सुरेश लोंढे, माढा तालुका राष्ट्रवादी पक्ष निरीक्षक आर डी पवार, प्राचार्य महेंद्र कदम आदी उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा