गोल पोस्ट गुन्हा नाशिक मध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्याची गोळ्या घालून हत्या

नाशिक मध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्याची गोळ्या घालून हत्या

नाशिक, ७ ऑक्टोंबर २०२०: राज्यात कोरोना महामारीचा प्रकोप हळूहळू निवळताना दिसत आहे. पण, दुसरीकडं गुन्हेगारी मधे मात्र राज्यात धुमाकूळ घालताना दिसतोय. राज्यातील अनेक शहरांत सध्या हत्या, चोरी, बलात्कार अशा गुन्ह्यांनी शिरकाव केला आहे. नुकतीच पुण्यातील हत्येची घटना ताजी आसताना आता नागपूर मधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

नाशिक तालुक्यातील वडझिरे ग्रामपंचायतीचे कर्मचारी देविदास कुटे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आलीय. हल्लेखोरांनी एकूण चार गोळ्या झाडल्या ज्यापैकी तीन गोळ्या देविदास कुटेंना लागल्या त्यामुळं त्यांचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी रात्री साडे आकरा वाजण्याच्या सुमारास हि घटना घडल्याचे समजले.

हत्या का झाली याचं नेमकं कारण काय ते अद्याप समजू शकलं नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे. याप्रकरणी संशयित सख्या भावासह साथीदारास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर घडल्या घटने मुळं गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

error: Content is protected !!
Exit mobile version