Grand Launch of Aryans Groups Premium Fashion Clothing Line: आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीजच्या व्यवस्थापकीय संचालिका स्मिता शितोळे यांच्या संकल्पनेतून उभ्या राहिलेल्या प्रीमियम फॅशन क्लोदिंगचा भव्य शुभारंभ दिनांक २७ मार्च २०२५ रोजी दुपारी ४ वाजता बावधन येथील आर्यन्स मीडिया हाऊस येथे पार पडणार आहे. या भव्य शुभारंभाला प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालिका स्मिता शितोळे यांनी पत्रकरांना बुधवारी दिली.


माध्यमांशी बोलताना स्मिता शितोळे यांनी माहिती दिली की,’प्रीमियम फॅशन क्लोदिंग’ हे माझ्या स्वप्नातील प्रकल्पांपैकी एक असून यानिमित्ताने ‘आर्यन्स’च्या अवकाशातील आकाशगंगेत एका नवीन ताऱ्याची भर पडणार आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमाला जास्तीत जास्त फॅशन प्रेमींनी उपस्थित राहावे, असे आर्यन्स ग्रुपकडून यावेळी आवाहन करण्यात आले. हा नवा उपक्रम आर्यन्सच्या आकाशात आणखी एक तारा जोडणारा ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
न्यूज अनकट प्रतिनिधी, प्रथमेश पाटणकर