माणगावकरांचे आराध्य ग्रामदैवत वाकडाई मातेचा भव्य पालखी महोत्सव

माणगाव, रायगड १५ फेब्रुवारी २०२४ : रायगडच्या माणगाव तालुक्यातील माणगावकरांचे आराध्य ग्रामदैवत असणाऱ्या उतेखोल तसेच संपूर्ण माणगाव गावचे संरक्षण कवच असणाऱ्या आई वाकडाई मातेच्या मंदिर वर्धापन दिनानिमित्त, भव्य पालखी महोत्सव १४ फेब्रुवारी रोजी पार पडला. यावेळी माणगाव तालुक्यातील बहुसंख्य पटनोंदणी व १००% उपस्थिती असणाऱ्या रायगड जिल्हा परिषद शाळा उतेखोलवाडीच्या विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेष-भूषा करत पालखी सोहळ्यात सहभाग नोंदवला.

पालखी मध्ये शाळेच्या इयत्ता ३ री चे विद्यार्थी गौरव सुरेंद्र मोरे याने भगवान श्रीराम यांची तर आराध्या निलेश गोरेगावकर हिने सीता माईंची, तनिष प्रमोद जाधव याने बजरंगबली श्री हनुमान यांची तर राहूल अक्षय मोहिते याने श्री लक्ष्मण यांची वेशभूषा करत उतेखोलवाडीच्या ग्रामस्थांची वाहवा मिळवली. या सहभागी विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्यध्यपिका शमिका अंबुर्ले, उपक्रमशील शिक्षिका विनया जाधव, जेष्ठ शिक्षिका नंदिनी वाले, स्नेहल उतेकर यांनी प्रेरणा दिली.

उतेखोलवाडी येथे ग्रामदैवत वाकडाई मातेची पालखी आल्यानंतर पोलीस पाटील रामचंद्र मुंढे, माजी उपनगराध्यक्ष तथा वाकडाई मंदिर ट्रस्ट उपाध्यक्ष संदीप खरंगटे, सचिव भागोजी मुरकर, नगरसेविका रश्मी सागर मुंढे, समाजसेवक नामदेव खराडे, सामाजिक कार्यकर्ते राजू मुंढे तसेच उतेखोलवाडीचे उत्सव कमिटी अध्यक्ष सुधाकर पालकर (गुरुजी), सहसचिव सागर मुंढे, खजिनदार विजय मुंढे यांसह ग्रामस्थ आणि महिला भगिनींनी वाकडाई मातेच्या पालखी चे औक्षण करत वंदन व नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतले. या पालखी सोहळ्याचे मार्गक्रमण उतेखोल गावं आई वाकडाई मंदिर ते कचेरी रोड मार्गे -साईमंदिर समता नगर,उतेखोल वाडी श्री हनुमान मंदिर,वाकडाई नगर मार्गे मंदिराकडे प्रस्थान असे होते.यामध्ये माणगाव तालुक्यातील अनेक भाविकांनी आई वाकडाई मातेच्या या सोहळ्याला उपस्थिती दर्शविली.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रमोद जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा