उस्मानाबाद, २० ऑगस्ट २०२०: खरिप हंगाम २०१९ मध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील ९६ गावांत पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणी केली नाही. शेतकऱ्यांचा खरिप हंगाम वाया गेला. त्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. पेरणी न झालेल्या क्षेत्रांचे पंचनामे झाले होते. नंतर अवेळी झालेल्या पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे अनुदान मिळाले परंतू पेरणी न झालेल्या शेतकऱ्यांचे अनुदान प्रलंबित होते.
माजी मंत्री प्रा. तानाजीराव सावंत साहेब यांच्या समवेत त्या अनुषंगाने मदत व पुनर्वसन सचिव मा. किशोर राजेनिंबाळकर यांच्याकडे वेळोवेळी भेटून सातत्याने पाठपुरावा चालू होता.
या पाठपुराव्याने तालुक्यातील ९६ गावातील ३५,६१२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांसाठी २४ कोटी ८९ लाख रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. ही मदत बाधित शेतकऱ्यांना २ हेक्टर पर्यंत मर्यादित असून तालुक्यातील बागायती क्षेत्र ६०२ व्हेक्टर आहे. प्रति हेक्टर १८०००/- व जिरायती क्षेत्र ३५,०१० हेक्टर आहे. प्रति हेक्टर ६८०० मिळणार असून २६ ऑगस्ट नंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील, अशी माहिती खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिली.
न्यूज अनकट प्रतिनिधी- प्रगती कराड