आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त राष्ट्रपतींकडून देशवासीयांना शुभेच्छा

नवी दिल्ली २१ जून २०२० : २०१५ पासून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोंदींच्या प्रयत्नानंतर २१ जून हा अंतरराष्ट्रीय योगा दिवस म्हणून साजरा केला जातो. या अंतरराष्ट्रीय योगा दिवसाचे हे ५ वे वर्ष आहे.

परंतू यावर्षी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय योगादिवस हा सार्वजनिकरित्या साजरा करता येत नसल्यामुळे प्रत्येकाने आपल्या घरातच राहून हा दिवस साजरा केला.

यावेळेस देशाचे प्रथम नागरिक व राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सर्व देशवासीयांना अंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत .

याप्रसंगी ते म्हणाले की योगाचे प्राचीन विज्ञान हि भारताने जगाला दिलेली उत्तम देणगी आहे. जास्तीत जास्त लोक त्याचा अवलंब करत असल्याचे पाहून आनंद झाला. ताणतणावामुळे आणि संघर्षात, आणि विशेषत: या कोविड १९ च्या काळात योगाभ्यास केल्याने शरीर तंदुरुस्त आणि मन प्रसन्न राहू शकते.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा