गोल पोस्ट महाराष्ट्र साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या ५१व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या ५१व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

इंदापूर दि.१८ जुलै २०२० : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या ५१ व्या पुण्यतिथि निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या हस्ते इंदापुर येथील श्रीराम चौक येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे आणि साठेनगर येथील प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्यात आले.

तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त विद्रोही साहित्य संमेलन अंतर्गत सोशल डिस्टन्स ठेवून सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे गारटकर यांनी आवाहन केले.

तसंच कोरोना महामारी संकटावर आपण सर्वांनी मिळून यशस्वीपणे मात करू असे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी मत व्यक्त केले.

या वेळी माजी नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे, राष्ट्रवादी काँग्रेस इंदापूर शहराध्यक्ष अनिल राऊत, प्रा .अशोक मखरे, नगरसेवक दादासाहेब सोनवणे, सतिश सागर, ललेंद्र शिंदे, मयुर ढावरे, ऊमेश ढावरे, बापू आडसुळ, सचिन गायकवाङ,बाळू आडसुळ, चंद्रकांत सोनवणे, विनायक लोंडे, राजु गुळीक,शिवाजी शिंदे सर ,राजू शिंदे,संजय खंडाळे, नंदू खंडाळे, बापू थोरात आणि दादा ढावरे आदी मान्यवर उपस्थित होते.

न्युज अनकट प्रतिनिधी :निखिल कणसे.

error: Content is protected !!
Exit mobile version