नीरा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

पुरंदर दि.१९ जुलै २०२० : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना संपूर्ण राज्यात अभिवादन केले जाते. निरा येथील अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानच्या वतीने देखील त्यांना आज अभिवादन करण्यात आले.

पुरंदर तालुक्यातील, नीरा येथे आज लोकशाहीर अण्णाभाऊंच्या पुण्यतिथी निमित्त अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानच्या वतीने त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुनील पाटोळे आणि ज्येष्ठ नागरिक शिवाजी पाटोळे यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सुनील पाटोळे, शिवाजी पाटोळे, नीलेश धुमाळ, सागर पाटोळे, कृष्णा आडगळे, आकाश पाटोळे, कृणल पाटोळे, रमेश वाघमारे, प्रकाश पाटोळे, गणेश पाटोळे, विकास पाटोळे, किरण पाटोळे उपस्थितीत होते.

यावेळी बोलताना सुनील पाटोळे म्हणाले की अण्णाभाऊंचे लोक साहित्यातील योगदान फार मोलाचे आहे. अण्णाभाऊंनी पोवाड्याच्या माध्यमातून शिव छत्रपती शिवाजी महाराजांची कारकीर्द लोकांपर्यंत पोहचवण्याचा मोठा प्रयत्न केला. त्यांनी निर्माण केलेले साहित्य बहुजन समाजासाठी मार्गदर्शक आहे. अशा या थोर साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना आपण जाणून घेतले पाहिजे. यांचे विचार समाजातील लोकांसाठी उपयोगी आहेत असेही ते म्हणाले.

न्युज अनकट प्रतिनिधी :
राहुल शिंदे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा