क्रांती दिनानिमित्त सासवडमध्ये हुतात्मा स्तंभासमोर क्रांतीकारकांना अभिवादन

पुरंदर, दि.९ ऑगस्ट २०२०: आज क्रांती दिना निमित्त पुरंदर तालुक्यातील सासवड शहरातील धान्य बाजारपेठेतील हुतात्मा स्तंभाला बाळासाहेब चव्हाण मित्र परिवारा तर्फे‌ अभिवादन करण्यात आले. दर वर्षी बाळासाहेब चव्हाण मित्र परिवाराच्यावतीने क्रांती दिनी अभिवादन करण्यात येते.

ब्रिटिशांची १५० वर्षांची जुलमी राजवट उलथून टाकण्यासाठी १८५७ पासून अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. यामध्ये पुरंदर तालुक्यातील सासवड शहरातील अनेकांनी सहभाग घेतला होता. त्यांच्या प्रित्यर्थ सासवड शहरात हुतात्मा स्मारक उभारण्यात आले आहे. गेली १९ वर्ष बाळासाहेब चव्हाण मित्र परिवाराच्यावतीने दरवर्षी ९ ऑगस्ट रोजी क्रांती दिना निमित्त हुतात्मा स्मारका समोर या ज्ञात- अज्ञात क्रांतीकारकांना अभिवादन केले जाते.

आज सकाळी हुतात्मा स्मारकात हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी सासवड नगर परिषदेचे नगर अध्यक्ष मार्तंड भोंडे, भाजपचे पुरंदर तालुका अध्यक्ष राजेंद्र जगताप, माजी उपनगराध्यक्ष संजय जगताप, संजय चव्हाण, माधव काकडे, संजय काकडे, परशुराम देशमुख, नारायण खळदे, बाळा पानसे, बाळासाहेब जगताप, निवृत्त लष्करी अधिकारी किरण पुरंदरे, धनंजय जगताप, रवींद्र गाडे आदी उपस्थित होते.

न्युज अनकट प्रतिनिधी – राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा