अंगणवाडी केंद्रात ‘ग्रोथ मॉनिटरिंग’ होणार सुरु

बारामती, दि. ३ जुलै २०२०: राज्य शासनाच्या असलेल्या एकात्मिक बालविकास सेवा योजने अंतर्गत राज्यातील अतितीव्र कुपोषित मुले शोधणे व त्यांना नियमित बालकांप्रमाणे वजन, उंची होण्यासाठी ‘ग्रोथ मॉनिटरिंग’ केले जाते. लॉकडाउनच्या काळात राज्यातील नवीन अतितीव्र कुपोषित बालकांचा शोध घेणे शक्य झाले नाही. यासाठी सद्यस्थितीत सर्वच अंगणवाडी केंद्रातील बालकांचे ‘ग्रोथ मॉनिटरिंग’ सुरू करण्याचे आदेश महिला व बालविकास विभागाने दिले आहेत.

कोरोना संसर्गामुळे राज्यातील सर्वच अंगणवाड्या बंद ठेवण्यात आल्या होत्या त्यामुळे सामान्य व दुर्गम, अतिदुर्गम भागातील कुपोषित बालकांची माहिती घेणेे शक्य झाले नाही. आता अंगणवाड्या नियमित सुरू होणार असल्याने कुपोषित बालकांचा शोध घेऊन त्यांच्या शारीरिक विकासाची वाढ होण्यास मदत होणार आहे. महिला व बालविकास विभागाच्या आदेशानुसार अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी नियमित पणे अंगणवाडी केंद्र उघडावे.

अंगणवाडी केंद्रात मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा तसेच अंगणवाडी केंद्राने सोशल डिस्टन्स पाळावा तसेच ज्या लाभार्थ्यांना सर्दी खोकला व तापाची लक्षणे असणाऱ्या विद्यार्थ्यांना अंगणवाडी केंद्रात बोलावू नये रेड झोन व कंटेनमेंट झोन मध्ये घरोघरी भेटी देऊ नये. अंगणवाडीतील रोजच्या कामकाजाची नोंद कॉमन ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर मध्ये दैनंदिन स्वरूपात करण्यात यावी. तसेच पूर्व शालेय शिक्षण संदर्भात आयुक्तालयामार्फत यापूर्वी देण्यात आलेल्या निर्देशानुसार पालकांच्या व्हाट्सॲप ग्रुपद्वारे कार्यक्रम घेण्याची कारवाई करावी.असे सांगण्यात आले आहे.

एका दिवसात पाच मुलांना किंवा गरोदर माता यांना वजन व उंची घेण्यासाठी बोलावण्यात यावे. सर्व बालकांची वजन व उंची दर महिन्यात घेण्यात यावी व त्यांची नोंद ठेवण्यात यावी. अंगणवाडी सेविकांनी नवजात बालकांसाठी वजन घेण्यासाठी वापरण्यात येणारे वजन काटे वापरासंदर्भात झोळीसाठी आवश्यक असलेले कपडे पालकांनी घरूनच आणावेत अशा सूचना आदेश अंगणवाडी केंद्रांना देण्यात आल्या आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा